पिंपरी-चिंचवड

लोणावळ्यात अमली पदार्थ येतात कोठून?

CD

लोणावळा, ता. २९ : पर्यटननगरी लोणावळ्यात अंमली पदार्थांचा प्रभाव वाढत आहे. अल्पवयीन, शाळकरी मुले, तरुण वर्ग अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत आहे. शहरातील अमली पदार्थांची तस्करी, विक्री रोखण्यासाठी शहरातील सर्व पक्ष- संघटना एकवटल्या आहेत.

‘‘अमली पदार्थ व्यवहारांची पाळेमुळे खोदून काढत तरुण पिढीला व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि कठोर उपाययोजना कराव्यात,’’ अशी मागणी शहरातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी पोलिसांकडे केली आहे.

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत शहरातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात धडक देत पोलिसांशी चर्चा केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कविश्वर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास बडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासीर शेख, काँग्रेस शहराध्यक्ष राजू गवळी, आरपीआयचे शहराध्यक्ष कमलशील म्हस्के, मनसेचे शहर अध्यक्ष निखिल भोसले, शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष परेश बडेकर, माजी नगरसेवक देविदास कडू, भाजपचे माजी शहराध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष उमा मेहता, दादा धुमाळ, बाबा शेट्टी, अमित भोसले, जितेंद्र कल्याणजी, विकी बोत्रे, सलीम मणियार, संतोष कचरे, दीपक कांबळे, विशाल पाठारे, श्रवण चिकणे आदी उपस्थित होते.
लोणावळा शहर, ग्रामीण भाग शाळा, महाविद्यालयांचा परिसरात काही अमली पदार्थांसह हुक्का, गुटखा सर्रास उपलब्ध होत आहे. त्याचे सेवनही वाढले असून युवा पिढीचे नुकसान रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली.

शहरात अमली पदार्थ तस्करी आणि विक्रीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. शहरात असे प्रकार आढळल्यास ते तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे. संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.
- राजेश रामाघरे, पोलिस निरीक्षक, लोणावळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदाराच्या नावाने कॉल, बनावट सही; कोट्यवधींचा निधी बीड जिल्ह्यात वर्ग, संशयित आरोपींमध्ये सरपंचाचा समावेश

मला तीच हिरोईन हवी... लोकप्रिय दिग्दर्शकाने केली अक्षय कुमारची पोलखोल; म्हणाले, 'त्यांना लाज पण...

'बागेश्वर धाम'मध्ये मोठी दुर्घटना! मंडप कोसळल्याने भाविकाचा मृत्यू, 10 जण जखमी; धीरेंद्र शास्त्रींच्या वाढदिवसाला आले होते लोक

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल

Hotel Bhagyashree: आता हे काय? "अबकी बार तुळजापूर विधानसभा करणार पार …"; हॉटेल भाग्यश्रीचा मालक आमदार होणार?

SCROLL FOR NEXT