पिंपरी-चिंचवड

लोणावळ्यात जूनमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग

CD

लोणावळा, ता. ४ : यंदा पाऊस मेहेरबान झाल्याने मावळासह लोणावळ्यात यंदा पावसाने विक्रम केला असून जूनमध्ये वार्षिक सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. नागरिकांचे जनजीवन कोलमडले आहे. जून महिन्यातच एकूण सरासरीच्या जवळपास निम्मा पाऊस नोंदला गेला आहे.
जूनमध्ये गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदा ३० जूनअखेर १९२१ मिलिमीटर (७५.६३ इंच) पाऊस नोंदला गेला आहे. पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच असून १ जुलैपासून चार दिवसांत ३६९ मिलिमीटर (१४.५२ इंच) पाऊस नोंदला गेला आहे.
लोणावळ्यात गेल्यावर्षी आजअखेर केवळ ८३१ मिलिमिटर पावसाची नोंद झाली होती. यंदा पावसाने मे महिन्यापासूनच जोरदार हजेरी लावली असून अद्यापही उसंत घेतलेली नाही. यंदा एकट्या मे महिन्यातच ४९९ मिमी पाऊस नोंदला आहे.
लोणावळ्यात नगरपालिकेच्या वतीने पाऊस मोजला जातो. याबरोबर टाटा पॉवर कंपनी तसेच आयएनएस शिवाजी केंद्रातही पावसाची नोंद ठेवली जात असून या दोन्ही ठिकाणी नोंदला गेलेला लोणावळा नगरपालिकेपेक्षा अधिक आहे. अद्याप उघडीप न दिल्याने शेतांचा वापसाही झाला नाही. परिणामी, कित्येक एकरांवर भात पिकांच्या पेरण्याही झाल्या नाहीत. धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत जवळपास ७० टक्क्यांवर पोचला आहे. घाटमाथ्यावर पावसाचा अजूनही जोर आहे. हा जोर असाच राहिल्यास यंदा रेकॉर्डब्रेक पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.

पंधरा वर्षातील जूनमधील पावसाची आकडेवारी
वर्ष - एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये (कंसात इंचात)
जून २०१० - ४१०.४० (१६.१६)
जून २०११ - ७९० (३१.१०)
जून २०१२ - ४९०.४ (१९.३१)
जून २०१३ - १४८५ (५८.४८)
जून २०१४ - ११५ (४.५३)
जून २०१५ - १२३२ (४८.५०)
जून २०१६ - २६७ (१०.५१)
जून २०१७ - १२९१ (५०.८३)
जून २०१८ - ७३७ (२९.२)
जून २०१९ - ५७६ (२२.६८)
जून २०२० - ६१९ (२४.३७)
जून २०२१ - १०८५ (४२.७२)
जून २०२२ - १५२ (५.९८)
जून २०२३ - ५३८ (२१.१८)
जून २०२४ - ६०२ (२३.७०)
जून २०२५ - १९२१ (७५.६३)
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT