पिंपरी-चिंचवड

लोणावळ्यात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ

CD

लोणावळा, ता. २३ : शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांची सोनसाखळी लंपास करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हा डाव साधला. यात त्यांनी दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. मंगळवारी (ता.२२) रात्री आठ ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास या दोन्ही घटना घडल्या.
पहिल्या घटनेप्रकरणी मंगल चंद्रकांत मराठे यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्या रात्री आठच्या सुमारास रेल्वे इन्स्टिट्यूट येथील बराकी चाळीच्या रस्त्याने त्यांच्या नातीला घेऊन जात होत्या. त्याचवेळी पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मराठे यांचे मंगळसूत्र हिसकावत पळ काढला. दुसऱ्या घटनेत तुंगार्ली चौकातून माधवी अंभोरे या जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावत पोबारा केला. दरम्यान, शहरात रहदारी असतानाही चोरट्यांनी उच्छाद मांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Test Records: इंग्लंडच्या 'रूट'चे कसोटीतील १२ विक्रम माहित्येय का? टीम इंडियाला त्याची भीती वाटण्याचं कारणच ते आहे

Narendra Modi and Nehru : ‘या’ दिवशी पंतप्रधान मोदी मोडणार नेहरूंचा सर्वात मोठा विक्रम!

विराट-रोहितनंतर भारताच्या आणखी एका स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट...

Walmik Karad: कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या मयुरी बांगर नेमक्या कोण? वाल्मिक कराडसाठी केलं होतं उपोषण

Latest Maharashtra News Updates : धुळे जिल्ह्यात शेतकर्‍यांना पावसाची प्रतिक्षाच

SCROLL FOR NEXT