पिंपरी-चिंचवड

विसापूर किल्ल्यापाशी एक तरुण मृत्युमुखी

CD

लोणावळा, ता. २ : भाजे येथे पर्यटनासाठी आलेला पुण्यातील एक तरुण शनिवारी दुपारी धबधब्यापाशी पाय घसरून मृत्यूमुखी पडला. विसापूर किल्ल्याकडे जाताना आडवाटेने जाण्याचे धाडस त्याच्या जिवावर बेतले.
अब्राहम शिंसे (वय २९, बेथनी आश्रम, रामवाडी, पुणे) असे मृताचे नाव आहे. तो सुमारे वीस जणांच्या गटासह लोहगड व विसापूर किल्ला परिसरात आला होता. भाजे धबधब्यावर त्यांनी आनंद लुटला. त्यानंतर ते विसापूर किल्ल्यावर जाण्यासाठी निघाले. या किल्ल्याच्या उत्तरेला पाटण, तर दक्षिणेला लोहगड, मालेवाडीच्या बाजूने वाट आहे. नेहमीची वाट सोडून अब्राहमने भाजे गावाजवळील लेणी व धबधब्याच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. निसरड्या वाटेने जाताना पाय घसरून तो तीस ते चाळीस फूट खाली पडला. खडकावर डोके आपटल्याने गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
लोणावळा ग्रामीण पोलिस व शिवदुर्ग संस्थेच्या बचाव पथकाच्या त्याचा मृतदेह खाली आणला. शिवदुर्गच्या सागर कुंभार, सागर दळवी, मोरेश्वर मांडेकर, यश मसने, राजेंद्र कडू, पिंटू मानकर, ओंकार पडवळ, अशोक उंबरे यांनी त्यासाठी अथक प्रयत्न केले.

सूचनांकडे दुर्लक्ष

तरुणाईची बेफिकीर वृत्ती आणि अतिउत्साहामुळे वारंवार दुर्घटना होत आहेत. लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळांवर जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक निर्बंध घातले आहेत. गेल्याच महिन्यात ड्युक्स नोज, विसापूर, तुंगी किल्ला अशा ठिकाणी पडून पर्यटक जखमी झाले. काही जण बुडाल्याचे प्रकारही घडले. नियमांकडे दुर्लक्ष करणारे पर्यटक आत्मघात करीत आहेत.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार एक पाऊल पुढे... तनिष्का सोबत झाला साखरपुडा; मुंबईत रंगला भव्य सोहळा

Maharashtra Education : मराठी शाळांच्या सहभागाशिवाय 'विकसित महाराष्ट्र २०४७' व्हिजनची अंमलबजावणी कठीण

Kolhapur Circuit Bench Cases : १ लाख ७५ हजार खटले सर्किट बेंचकडे येणार, दोन न्यायाधीशांचे बेंच, जनहित याचिकाही शक्य होणार

रस्त्यावर पहाटे ४ पर्यंत दारूच्या नशेत लोळत पडलेला असायचा अभिनेता; पोलीस पकडायचे आता आहे अफाट श्रीमंत

Latest Marathi News Updates Live : 16 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचं अपहरण करत केला विनयभंग

SCROLL FOR NEXT