लोणावळा, ता. २० : लोणावळ्यात बुधवारी दुपारी भर रस्त्यात मद्यधुंद महिलांमध्ये वादावादी झाली. याची चित्रफीत व्हायरल झाली. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी चार महिलांवर गुन्हा दाखल केला. निगडी परिसरातील काही तरुण- तरुणी फिरायला आले होते. गवळीवाडा येथे काही तरुणींनी नशेत वाद घातला. त्यांनी मारहाणही केल्याचे चित्रफितीत दिसले. वाहतूक पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणी वाद घालत राहिल्या. अखेर पोलिसांनी दखल घेत सर्वांना पोलिस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल केला.
-----