पिंपरी-चिंचवड

शिवाजी मित्र मंडळ साकारणार आई तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती

CD

लोणावळा, ता. २६ : मावळाचा राजा असा लौकिक असलेल्या श्री शिवाजी गणपती मंडळ यंदा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती साकारत आहे.
मावळ तालुक्यात भव्य देखाव्यांसाठी प्रसिद्ध असणारे श्री शिवाजी मित्र मंडळ यावर्षी ६१व्या वर्षात पदार्पण करीत आहे. विविध मंदिरांचे दर्शन घडविणाऱ्या या मंडळाने यंदा देशभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारत आहे. हा देखावा आकर्षणाचा विषय ठरणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष प्रकाशराज चौहान, अध्यक्ष शिव अग्रवाल, उत्सवाध्यक्ष राजेंद्र टाटिया यांनी दिली. कार्याध्यक्ष चेतन प्रकाशराज चौहान, उपाध्यक्ष जयंतीलाल ओसवाल, कांतिलाल भंडारी, कोषाध्यक्ष राहुल चौहान, सचिव सुनील बोके, विनोद ओसवाल हे यंदाचे कार्यकारिणी सदस्य आहे.
शिवाजी मित्र मंडळांच्या वतीने साकारण्यात येणारे भव्य देखावे मावळातील गणेश भक्तांसाठी पर्वणी असते. यंदाही तुळजापूर मंदिराची भव्य प्रतिकृती ७३ फुट लांब, ३२ फुट रुंद व ४० फुट उंच अशा भव्य स्वरूपात हा देखावा साकारत आहे. मंडळाने यापूर्वी अयोध्या येथील राम मंदिर, स्वामी विवेकानंद स्मारक, लाल किल्ला, इस्कॉन मंदिर, अक्षरधाम मंदिर, राणकपूर मंदिर, सम्मेद शिखरजी जैन तीर्थ, तिरुपती बालाजी, बाबा अमरनाथ असे देखावे साकारले आहेत. मंडळाच्या वतीने यंदा अथर्वशीर्ष पठण, महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन, महिलांसाठी मंगळागौर, संगीतमय कार्यक्रम, गणेशयाग आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Municipal Election : निवडणूक प्रक्रियेवर नाराजी! चक्क उमेदवार मतदारांना सांगतोय, 'मला मतदान करू नका'; असं का करताहेत घोडके?

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला

Kolhapur Politics : गावोगावचे रस्ते-पाणी-शाळांचे खरे प्रश्न गायब; जिल्हा परिषद निवडणुकीत ‘राज्य-देश पातळीचा प्रचार’च का ठरतोय केंद्रस्थानी?

Overthinking: ओव्हरथिंकिंगचा कंटाळा आला? जपानी लोकांच्या ‘या’ खास पद्धती नक्की वापरून बघा!

AI Video Apps : AI ने बनवलेले व्हिडिओ नेमके ओळखायचे कसे? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT