लोणावळा, ता. १० : आगामी लोणावळा नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासह सोळा तर भाजपने ११ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. नागरिकांमधून थेट होणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र सोनवणे यांच्या नावाची राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, निरीक्षक विठ्ठलराव शिंदे, शहराध्यक्ष रवी पोटफोडे, सुहास गरुड यांच्या उपस्थितीत घोषणा करण्यात आली. तर भाजपचे निरीक्षक माजी मंत्री बाळा भेगडे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, शहराध्यक्ष अनिल गायकवाड, श्रीधर पुजारी यांच्या उपस्थितीत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नगराध्यक्ष पदासाठी भाजप व इतर पक्षांच्या वतीने अद्यापही चर्चा सुरू आहे.
लोणावळा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. सोमवारपासून (ता.१०) नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. १७ नोव्हेंबर अखेरची तारीख आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या यादीनुसार जुन्या-नव्यांचा मेळ घालत तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, स्थानिक पातळीवर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दोन्ही पक्षांच्या याद्या जाहीर झाल्याने लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत रंगत आणखी वाढली आहे. पुढील काही दिवसांत शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरपीआय, मनसे, काँग्रेस आणि इतर अपक्ष उमेदवारांच्या याद्याही जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजपने पहिल्या टप्प्यात जाहीर केलेली यादी
प्रभाग क्र.१: शुभांगी गिरीगोसावी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला). सुधीर पारिठे (सर्वसाधारण), प्रभाग क्र.५ : ब्रिंदा गणात्रा (सर्वसाधारण महिला), सुभाष डेनकर (सर्वसाधारण). प्रभाग क्र. ६ : रेश्मा अर्जुन पाठारे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), दत्तात्रेय येवले (सर्वसाधारण).
प्रभाग क्र. ७ : सुरेखा जाधव (सर्वसाधारण महिला), देविदास कडू (नागरिकांचा मागास प्रवर्ग). प्रभाग क्र. ११ : रचना सिनकर (अनुसूचित जमाती महिला). प्रभाग क्र. १२ : विजया वाळंज (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), अभय अशोक पारेख (सर्वसाधारण).
राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या टप्प्यात जाहीर केलेली यादी
प्रभाग क्र. १ : सनी राम दळवी (सर्वसाधारण), प्रभाग क्र.२ : अनिता अंभुरे (सर्वसाधारण महिला), मंगेश मावकर (नागरिकांचा मागास प्रवर्ग). प्रभाग क्र. ३ : लक्ष्मी नारायण पाळेकर (सर्वसाधारण महिला), प्रभाग क्र.४ : रजनीकांत यंदे (सर्वसाधारण). प्रभाग क्र. ५ : वसुंधरा दुर्गे (सर्वसाधारण महिला), मुकेश परमार (सर्वसाधारण). प्रभाग क्र. ६ : दीपक मालपोटे (सर्वसाधारण). प्रभाग क्र. ११ : जीवन गायकवाड (सर्वसाधारण), भाग्यश्री महादेव जगताप (अनुसूचित जमाती महिला). प्रभाग क्र. १२ : अमृता अमोल ओंबळे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), भरत हरपुडे (सर्वसाधारण). प्रभाग क्र. १३ : धनंजय काळोखे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), प्रियंका कोंडे (सर्वसाधारण महिला), सोनाली मराठे (सर्वसाधारण महिला).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.