पिंपरी-चिंचवड

वेळीच निदान झाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा

CD

लोणावळा, ता. १४ : ‘वेळीच निदान झाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे मनामध्ये भीती न बाळगता तत्काळ तपासणी व योग्य उपचार करावेत,’ असे प्रतिपादन पवना रुग्णालय व रोटरी क्लबच्या वैद्यकीय संचालिका डॉ. वर्षा वाढोकर यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, ‘संपर्क-सोशल अ‍ॅक्शन फॉर मॅनपॉवर क्रिएशन’ आणि ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर यांच्या वतीने मळवली येथे स्तनाचा कर्करोग व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर झाले. यावेळी डॉ. वाढोकर बोलत होत्या. रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीशैल मेंथे, धनंजय मथूर, संपर्क संस्थेचे संचालक अमितकुमार बनर्जी, मुख्य प्रकल्प सल्लागार नवनीता चॅटर्जी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुजकुमार सिंह, व्यवस्थापक सतीश माळी, डॉ. विजय सुत्रावे, प्रदीप वाडेकर, प्रा. चेतन देशमुख आदी उपस्थित होते. उपस्थित महिलांना कर्करोगाची प्राथमिक लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय याविषयी माहिती देण्यात आली. शिबिरात परिसरातील ११२ महिलांची स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली. १७६ महिलांची हिमोग्लोबिन रक्त तपासणी झाली. डॉ. सिमरन थोरात, डॉ. प्रशांत वेखंडे, डॉ. स्नेहल गायकवाड, शिवाजी मोहिते, अतिश भागवत, परिचारिका श्रद्धा कटोले, दीपाली चुकाटे, वंदना नाईक आदींनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

SCROLL FOR NEXT