पिंपरी-चिंचवड

लोणावळा नगर परिषदेसाठी अर्जांचा पाऊस

CD

लोणावळा, ता. १७ : नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी चढाओढ दिसून आली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (ता.१७) तब्बल ६३ अर्ज दाखल झाले. तर, आतापर्यंत १५२ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये ७३ पुरुष आणि ७९ महिला इच्छुकांचा समावेश आहे.

नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एससी) राखीव आहे. अखेरच्या दिवशी या प्रवर्गातून नगराध्यक्ष पदासाठी सात जणांनी अर्ज दाखल केले असून एकूण दहा अर्ज दाखल झाले आहे. नगर परिषद निवडणुकीत नगरसेवकांसाठी १३ प्रभागांमध्ये २७ जागा आहेत. शिवसेना-रिपाइं (आठवले गट) युतीचे उमेदवार सूर्यकांत वाघमारे, भाजपचे उमेदवार गिरीश कांबळे यांच्यासह बलराज रिले, शशिकांत जाधव, विनायक शिंदे, सुभाष सोनवणे यांनी शक्तिप्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले. दिवसभर उमेदवार, त्यांचे समर्थक, विविध पक्षांचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक यांची गर्दी उमेदवारी अर्ज दाखल केंद्रावर दिसून आली. अनेकांनी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या, तर काही इच्छुक दुपारनंतर उमेदवारीसाठी दाखल झाल्याचे दिसून आले.

आज अर्ज छाननी
या दाखल अर्जांची छाननी मंगळवारी (ता.१८) होणार आहे. १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर अंतिम यादी जाहीर होणार असून सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. निवडणुकीत पक्षीय रणनीती, स्वबळावर लढणारे उमेदवार, तर काहींच्या पक्षांतरामुळे राजकीय समीकरणांना वेग येण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : लग्नात ५० तोळे सोनं, नंतर ३५ लाख रोकड दिली, मुलगा हवा म्हणून गर्भपात करायला लावला; इंजिनिअर विवाहितेनं संपवलं जीवन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 जानेवारी 2026

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका कमी, पावसाची होणार एन्ट्री, आज तुमच्या भागात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Yogi Government : योगी सरकारचा मोठा प्लॅन; उत्तर प्रदेशात ग्रामीण अर्थव्यवस्थेची धुरा आता महिलांच्या हाती

आजचे राशिभविष्य - 27 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT