पिंपरी-चिंचवड

वाकसई येथे विहिरीतून तीन मोटारसायकली जप्त

CD

लोणावळा, ता. २७ : वाकसई (ता. मावळ) येथे चोरीला गेलेल्या मोटारसायकलीचा मागोवा घेण्यासाठी करण्यात आलेल्या शोधमोहिमेदरम्यान अनपेक्षितपणे तीन वेगळ्या मोटारसायकली विहिरीतून सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ज्यासाठी शोधमोहीम राबविण्यात आली होती. ती मूळ मोटारसायकल न सापडता इतर तीन अज्ञात मोटारसायकली मिळून आल्या. ही कारवाई लोणावळा शहर पोलिस व शिवदुर्ग मित्र यांच्या संयुक्त पथकातर्फे करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शहर पोलिस हद्दीत घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. या घटनेत एक मोटारसायकल चोरी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार वसीम सल्लाउद्दीन चौधरी (रा. वाकसई, मावळ) यास अटक केली आहे. आरोपी ज्याठिकाणी वास्तव्यास आहे त्याठिकाणी पोलिसांनी शोध मोहीम राबवली. दरम्यान, आरोपीच्या घराजवळील विहिरीत मोटारसायकल लपवून ठेवली असल्याची शक्यता गृहीत धरून लोणावळा पोलिस व शिवदुर्ग पथकाने विहिरीत शोधकार्य केले. विहिरीच्या तळात चिखल व गाळ मोठ्या प्रमाणावर असल्याने शोधकार्य अत्यंत जोखमीचे होते. मात्र, पथकातील सदस्यांनी समन्वय व धाडसाच्या बळावर शोधमोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करत तीन मोटारसायकली विहिरीबाहेर काढल्या. सापडलेल्या तिन्ही मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्यांची तपासणी सुरू आहे. मोटारसायकली कोणाच्या आहेत, त्या कशा पाण्यात टाकण्यात आल्या, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. या शोधमोहिमेने परिसरातील चोरीच्या गुन्ह्यांना नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी अनिल केरूरकर, संदीप मानकर, राहुल चोरगे, शशिकांत खोपडे, शिवदुर्ग मित्रचे सागर दळवी, महेश मसने, राजेंद्र कडू, कपिल दळवी, सुनील गायकवाड यांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र-लास्ट वाइल्डरनेसमध्ये सामंजस्य करार; मानव व वन्यजीव सहअस्तित्व होणार बळकट!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 फेब्रुवारी 2026

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

SCROLL FOR NEXT