लोणावळा, ता. २ : लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. मात्र अनेक ठिकाणी मतदान केंद्र बदलल्याने तसेच नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याने मतदारांना धावाधाव करावी लागली. अनेक मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केली. काही मतदार मतदान न करताच माघारी फिरले. दुपारी मतदानाचा वेग मंदावला. दुपारी साडेतीनपर्यंत ५६ टक्के मतदान झाले. यामध्ये १३ हजार ४५८ पुरुष तर १३ हजार ५६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवक पदाच्या २७ जागा असून, त्यापैकी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. वॉर्ड क्रमांक ५ ‘ब’ सर्वसाधारण व वॉर्ड क्रमांक १० ‘अ’ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे २२ जागांसाठी ७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सकाळपासून मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर विशेषतः तुंगार्ली, नांगरगाव, खंडाळा या प्रभागांमध्ये केंद्रांवर रांगा दिसत होत्या. प्रभाग क्रमांक १३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादी झाली. तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये बोगस मतदानाचा प्रकार रोखल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल, डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालय या केंद्रावर मशिन बंद पडल्याने गोंधळ उडाला. प्रशासनाच्या वतीने मतदारांना सोयीसाठी प्रशासनाकडून मदतकक्ष, मार्गदर्शक फलक व सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व प्रथमच मतदान करणाऱ्यांचा सहभाग लक्षणीय दिसून येत आहे. दुपारी चारनंतर मतदानाचा वेग कायम ठेवत नागरिकांकडून लोकशाहीच्या सणात उत्साहाने सहभाग नोंदवला जात आहे. पोलिसांच्या वतीने यादरम्यान मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
छायाचित्र:LON25B04943
रायवूड : येथील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावत आपला मतदानाचा हक्क बजावला.
छायाचित्र: LON25B04944
भांगरवाडी : येथे पोलिंग बूथवर नावे शोधण्यासाठी झालेली गर्दी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.