पिंपरी-चिंचवड

निलंबनाचे अधिकार जिल्हा कमिटीला नाहीत

CD

लोणावळा, ता. २८ : ‘‘जिल्हा काँग्रेस कमिटीला ब्लॉक अध्यक्षांच्या निलंबनाचे अधिकारच नाहीत. लोणावळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची नियुक्ती थेट प्रदेश काँग्रेस कमिटीकडून होते. त्यामुळे जिल्हा कमिटीने केलेली निलंबनाची कारवाई ही पक्षाच्या संघटनात्मक नियमांविरोधात आहे,’’ अशी प्रतिक्रिया लोणावळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू गवळी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव निखील कवीश्वर यांनी दिली.

लोणावळा नगर परिषद निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस पक्षाने निखील कवीश्वर आणि राजू गवळी यांना पक्षातून निलंबित करण्याचा आदेश दिला होता. हा आदेश पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी काढला होता. मात्र, या कारवाईस तीव्र विरोध करत कवीश्वर व गवळी यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
‘‘कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देणे आवश्यक असते, मात्र आम्हाला अशी कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. तसेच नगरपरिषद निवडणुकीदरम्यान एबी फॉर्म आमच्याकडे नव्हते. आमच्यावर एकतर्फी कारवाई करण्यात आली आहे,’’ असा आरोप त्यांनी केला.
‘‘पुणे जिल्ह्यात नगर परिषद निवडणूक काँग्रेस पक्षाचे केवळ चार नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये जुन्नर येथे एक तर लोणावळा येथे तीन नगरसेवक काँग्रेसकडून विजयी झाले आहेत. अशा परिस्थितीत लोणावळ्यात मिळालेल्या यशाचे श्रेय नाकारून आमच्यावर कारवाई करणे अन्यायकारक आहे,’’ असे त्यांनी नमूद केले. याबाबत प्रदेश काँग्रेस कमिटीसमोर दाद मागणार असल्याचेही संकेत दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Bike Accident : कात्रजमध्ये दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू

Sewage Water Issue : पुणे शहरात ७० ठिकाणी पिण्याच्या पाण्यात मैलापाणी

Jay Pawar: ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाहीत; जनतेला सत्य जाणून घेण्याचा हक्क, सूचक वक्तव्य करत जय पवारांची मोठी मागणी

Google Investment : गुगल भारतात १.३५ लाख कोटींची गुंतवणूक करणार ; अमेरिकेपर्यंत समुद्राखाली केबल टाकणार

SCROLL FOR NEXT