लोणावळा, ता. ३० : राजेंद्र सोनवणे हे नगराध्यक्ष पदाचा पदभार बुधवारी (ता.३१) स्वीकारणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता लोणावळा नगर परिषद सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
आमदार सुनील शेळके, आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. लोणावळा येथील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस व सहयोगी पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.