पिंपरी-चिंचवड

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आंतरभारती बालग्रामचा प्रकल्प प्रथम

CD

लोणावळा, ता. १ : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भुशी येथील आंतरभारती बालग्राम विद्यालयाने सादर केलेल्या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकाविला.
पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग), मावळ तालुका पंचायत समिती, तालुका मुख्याध्यापक संघ आणि मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा महाविद्यालयात ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन झाले. या प्रदर्शनात सहावी ते बारावीच्या गटातील ५७ शाळांमधून एकूण १२० प्रकल्प सादर करण्यात आले. यामध्ये नववी ते बारावी गटात आंतरभारती बालग्राम विद्यालयाने सादर केलेल्या ‘अ‍ॅडव्हान्स एलपीजी गॅस डिटेक्शन सिस्टीम’ या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. हा प्रकल्प दहावीतील विद्यार्थी ओंकार टूले याने विज्ञान शिक्षिका स्लोमी बिजू, सोमनाथ ठोंबरे व सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साकार केला.
पारितोषिक वितरण समारंभात पुणे जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर आणि संस्थेचे विश्वस्त दत्तात्रेय येवले यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश कदम, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी मेधा ओक, शिक्षक, पालक, आजी-माजी विद्यार्थी, संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

छायाचित्र: LON25B05063

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT