पिंपरी-चिंचवड

राजस्थानमध्ये वारकऱ्यांच्या उपस्थितीत घुमणार विठ्ठल भक्तीचा गजर

CD

लोणावळा, ता. ५: मावळ तालुक्यातील शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत राजस्थानातील श्री क्षेत्र खंदरा येथे विठ्ठल भक्तीचा गजर दुमदुमणार आहे. गुरुदेव ब्रह्मलीन देवमुनि महाराज यांच्या निर्वाणदिनी दरवर्षीप्रमाणे यंदाही राजस्थानातील श्री क्षेत्र खंदरा हनुमान मंदिर येथे २४ वा भक्ती महोत्सव रविवारी (ता.११) भक्तिभावात होणार आहे. या महोत्सवासाठी मावळसह महाराष्ट्र व राजस्थान येथील वारकरी, भाविक व संत मंडळी सहभागी होणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय वारकरी संप्रदाय राजस्थान प्रदेशाध्यक्ष रमेशसिंह व्यास राजपुरोहित व मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे महाराज यांनी दिली.
या महोत्सवात पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरवात होऊन महाआरती, वेदपाठी ब्राह्मणांच्या उपस्थितीत हवन-यज्ञ, शोभायात्रा, पालखी मिरवणूक, महाप्रसाद, संगीतमय सुंदरकांड, दीपयज्ञ तसेच भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे.
संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि भक्ती चळवळीचा संगम असलेल्या या महोत्सवात हनुमानदास महाराज व रामानंद महाराज यांच्या सान्निध्यात भक्तिरसाचा जागर होणार आहे.
राजस्थानच्या भूमीत महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा गौरव उंचावणारा हा भक्ती महोत्सव विश्वप्रेम, एकता व अध्यात्माचा संदेश देणारा ठरणार असल्याचे व्यास यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

SCROLL FOR NEXT