पिंपरी-चिंचवड

राष्ट्रवादीची ओबीसी सेलची कार्यकारिणी जाहीर

CD

लोणावळा, ता.७ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. रमेश सुतार (ताजे), अशोक आनंदे (कान्हे) यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
तालुका अध्यक्ष मारुती देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी प्रदेश सुतार महासंघ विश्वस्त रमेश सुतार, अशोक आनंदे, माजी सरपंच नवनाथ गायकवाड, मारुती जाधव, मावळ तालुका राष्ट्रीय गुरव समाज उपाध्यक्ष गणेश देशमुख, गणपत गराडे, गणपत पवार आदी यावेळी उपस्थित होते.
वडगाव मावळ येथे शुक्रवारी (ता.९) होणाऱ्या मेळाव्यात आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

अन्य पदाधिकारी :
प्रवक्ता - नवनाथ गायकवाड (टाकवे), प्रसिद्धी प्रमुख- गणेश देशमुख (देवघर), खजिनदार - गणपत पवार (बेडसे), महेश घनवट (औंढे), सहखजिनदार - नामदेव सुतार (डोणे), संघटक - तुकाराम ठोसर, (मळवली),
चिटणीस - शरद भालेकर (दारुंब्रे), रुपचंद गायकवाड (ताजे), सहचिटणीस - गोरख भालेकर (जाधववाडी),
कार्यकारिणी सदस्य - नितीन मोरे (टाकवे आंदर मावळ).
लोणावळा शहर अध्यक्ष : समीर खोले, तळेगाव शहर अध्यक्ष - अतिश मोरे, वडगाव शहर अध्यक्ष - अभिजीत मोरे,
कामशेत शहर अध्यक्ष मारुती जाधव, देहू शहर अध्यक्ष प्रशांत सुतार, कार्याध्यक्ष रुचीर टिळेकर, देहूरोड अध्यक्ष - वैभव माळी, नाणे मावळ अध्यक्ष - अक्षय रोकडे, पवन मावळ अध्यक्ष - योगेश शहापुरे, आंदर मावळ अध्यक्ष - प्रदीप पवार, आंदर मावळ कार्याध्यक्ष - हनुमंत क्षीरसागर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

SCROLL FOR NEXT