पिंपरी-चिंचवड

उपनगराध्यक्ष पदासाठी उद्या निवडणूक

CD

लोणावळा, ता. ११ : लोणावळा नगरपरिषद उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य पदासाठी मंगळवारी (ता. १३) निवडणूक होणार आहे.
नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम घोषित केला आहे. नुकत्याच झालेल्या लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्चस्व राखत विजय प्राप्त केला. तर भाजप चार, काँग्रेस तीन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक, अपक्ष तीन असे पक्षीय बलाबल आहे.
उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी व भाजपकडूनही एक-एकजण इच्छुक आहे, किंवा महिला नगरसेविकेला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीकडून नगरपरिषद निवडणुकीच्या काळामध्ये अनेक स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाईल, असा शब्द देण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून दोन तर भाजपकडून एकाला स्वीकृत सदस्यपदी संधी मिळणार आहे. त्यापैकी प्रथम कोणाला संधी मिळते याकडे लक्ष आहे.

उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम
सकाळी १० ते १२ नामनिर्देशनपत्र स्वीकारणे, दुपारी १२ ते १२.१५ नामनिर्देशनपत्रांची छाननी, दुपारी १२.१५ ते १२.३० उमेदवारी मागे घेणे. त्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक मंगळवारी (ता. १३) जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात होणार आहे.

नामनिर्देशित सदस्यांची निवड
नगरपरिषदेतील नामनिर्देशित सदस्यांसाठी सोमवारी (ता. १२) पक्ष/गट प्रमुखांकडून नामनिर्देशन प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. मंगळवारी (ता. १३) उपाध्यक्ष निवडणुकीनंतर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्तीची घोषणा करण्यात येईल. ही सर्वसाधारण सभा कोणत्याही परिस्थितीत तहकूब केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगरपरिषदेचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs NZ:'गौतम गंभीरने ठरवलं तर तो स्वतः बॅटिंगला येईल; कठीण निर्णय मी आणि कोच मिळून...', फायनलपूर्वी सूर्यकुमार स्पष्टच बोलला

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या रोबोटिक्स आणि यूएव्ही सुविधेच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थिती लावली

फक्त 8 दिवसांमध्ये पालटणार 3 राशींच्या रखडत्या नशिबाचा खेळ ! शुक्रादित्य राजयोगामुळे पडणार पैशांचा पाऊस

T20 World Cup : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक बघितल्या गेलेला सामना कोणता? इंडिया-पाकिस्तान सामना राहिला तिसऱ्या क्रमांकावर...

'पूर्वेश अमर रहे'च्या घोषणांनी नागपूर हेलावले, वायुसेनेच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT