पिंपरी-चिंचवड

विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ज्ञानेश्वरी साबळेला सुवर्णपदक

CD

​लोणावळा, ता. २० : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा कार्यालय, पुणे आणि ॲमेच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, पुणे यांच्या वतीने आयोजित पुणे विभागीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत डॉ. बी. एन. पुरंदरे बहुविध विद्यालयातील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी साबळे हिने नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
या यशासह तिची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वडगाव मावळ येथील रमेशकुमार सहानी इंग्लिश मीडिअम स्कूल येथे ही स्पर्धा पार पडली. आठवीमध्ये शिकणाऱ्या ज्ञानेश्वरीने ६९ किलो वजनी गटात सहभागी होऊन स्कॉट ७५ किलो, बेंच प्रेस ३० किलो, डेडलिफ्ट ७५ किलो असे एकूण १८० किलो वजन उचलून तिने सुवर्णपदक आपल्या नावे केले.
​ज्ञानेश्वरीच्या या यशामुळे डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, क्रीडा प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींकडून तिचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

SCROLL FOR NEXT