पिंपरी-चिंचवड

लोणावळा नगरपरिषदेच्या विषय समिती निवडणूक

CD

​लोणावळा, ता. २० : लोणावळा नगर परिषदेच्या विषय समिती सभापती व सदस्य निवडीसाठी शुक्रवारी (ता.२३) निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या विषय समित्यांवरील सदस्यांचे नामनिर्देशन करणे, सभापतींची निवड करणे आणि स्थायी समिती स्थापन करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे. या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अशोक साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
​महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिकनगरी अधिनियम १९६५ मधील विविध कलमांनुसार ही प्रक्रिया पार पडणार आहे. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सदस्यांमधून या समित्यांची रचना केली जाणार आहे. लोणावळा नगरपरिषद सभागृहात विशेष सभा पार पडणार असून, सर्व नवनिर्वाचित सदस्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नगरपरिषदेतील स्वीकृत सदस्य व उपनगराध्यक्षपदाच्या निवडी झाल्या. त्यामुळे आता विषय समित्यांचे सभापती व सदस्यांच्या निवडीकडे शहराचे लक्ष लागले असून, कोणत्या नगरसेवकांना समित्यांवर संधी मिळते आणि सभापतीपदी कोणाची वर्णी लागते, याची उत्सुकता वाढली आहे.

​निवडणूक कार्यक्रमाचे वेळापत्रक
- शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून प्रक्रियेला सुरुवात होईल
​- सकाळी ११.०० ते ११.१५ : विषय समित्यांची संख्या आणि त्यातील सदस्य संख्या निश्चित करणे
- ​सकाळी ११.१५ ते ११.४५ : पीठासीन अधिकाऱ्यांकडे सदस्यांचे नामनिर्देशन सादर करणे
​- दुपारी १२.०० ते १२.३०: वैध नामनिर्देशन पत्रांची घोषणा
- ​दुपारी १२.३० ते २.३०: विषय समिती सभापती पदासाठी अर्ज सादर करणे
- ​दुपारी २.३० पासून : अर्जांची छाननी व पात्र उमेदवारांची घोषणा
- ​छाननीनंतर १५ मिनिटे : अर्ज मागे घेण्याची मुदत
​- अंतिम प्रक्रिया : त्यानंतर लगेचच आवश्यक असल्यास निवडणूक घेऊन निकाल जाहीर करणे व स्थायी समिती गठित करणे​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT