लोणावळा, ता. १३ : वलवण येथील आई लक्ष्मी मंदिर येथे चार महिन्यांपूर्वी घडलेल्या दागिने चोरीप्रकरणी अद्यापही ठोस तपास झालेला नसल्याचा आरोप करत मंदिराचे वडिलोपार्जित विश्वस्त रमेश पाळेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मंदिरातील देवीच्या गळ्यातील सुमारे सात ते आठ किलो चांदीचे तसेच सव्वा किलो सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी काही दिवस तपास केल्याचे सांगितले, मात्र त्यानंतर तपासाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, असा आरोप पाळेकर यांनी केला.
पाळेकर परिवार गेल्या पाच पिढ्यांपासून या मंदिराची पूजा-अर्चा करत असून हे त्यांचे वडिलोपार्जित मंदिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चोरीनंतर त्यांनी वारंवार संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी केली, मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘‘चोरीसारखी गंभीर घटना घडूनही तपासाची ठोस माहिती दिली जात नाही. केवळ चोरी नाही तर आमच्या आस्थेचा विषय असून नाइलाजास्तव आम्हाला पत्रकार परिषद घेऊन हा विषय मांडावा लागला. पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक करावी व आम्हाला अभय द्यावे,’’ अशी मागणी पाळेकर यांनी केली. तसेच, या प्रकरणाचा छडा न लागल्यास आई लक्ष्मी मंदिरासमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक भाविकांमध्येही नाराजी व्यक्त होत असून, चोरीचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.