पिंपरी-चिंचवड

लोणावळा महिला मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात

CD

लोणावळा, ता. १८ : महिला मंडळ लोणावळा यांच्या वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला. यावेळी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर महिला मंडळाच्या सदस्यांसाठी विविध मनोरंजक खेळ व स्पर्धा पार पडल्या.
यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरसेविका दीपा अगरवाल, आरती त्रिकोणे, सोनाली मराठी, अनिता अंभोरे, वसुंधरा दुर्गे, गायत्री रीले, रेश्मा पाठारे, स्वप्ना कदम तसेच नगरसेवक सनी घोणे उपस्थित होते. मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष सोनवणे यांनी महिला मंडळाने सादर केलेल्या ‘कार्डियाक ॲम्बुलन्स’ संदर्भातील पत्राचा विशेष उल्लेख केला. लोणावळा शहरासाठी ‘कार्डियाक ॲम्बुलन्स’ची आवश्यकता लक्षात घेता लवकरच ही ॲम्बुलन्स शहरात दाखल करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
महिला मंडळ लोणावळ्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. महिला सबलीकरण व सशक्तीकरणासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प मंडळाच्या अध्यक्षा मनीषा बंबोरी यांनी व्यक्त केला. मंडळातर्फे आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक सुलभा लांबट यांनी तर द्वितीय क्रमांक शशी बोरटकर यांनी पटकावला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेधा वैद्य, उमा मेहता, सुनीता रावण, क्षुतिका राणे तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रतिमा खळदकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: माळेगाव कारखान्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संचालकपदी बिनविरोध; संचालक मंडळाच्या विशेष सभेत निर्णय!

Viral Video : तुम्हीही नाश्त्यात पोहे आवडीने खाता ? व्हायरल व्हिडिओ पाहून उघडतील डोळे

PAK vs NAM सामन्यावर पावसाचे ढग; ऑस्ट्रेलियासारखीच पाकिस्तानची अवस्था होणार? नेमकं कसं आहे समीकरण

Latest Marathi News Live Update : सातारा नगरपरिषदेच्या ‘अघोरी नृत्या’ला अंनिसचा विरोध

Railway Loco Pilots: प्रशासनाकडून दबाव, तणावपूर्ण कामकाज अन्...; मुंबई लोकलच्या लोको पायलटांचा सामूहिक VRS अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT