पिंपरी-चिंचवड

ओंकार सुतार यांना ‘आदर्श युवक’ पुरस्कार

CD

लोणावळा, ता. १८ : कार्ला येथील शिवशंकर तरुण मंडळ यांच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंडळाकडून देण्यात येणारा ‘आदर्श युवक पुरस्कार’ ओंकार रामदास सुतार यांना प्रदान करण्यात आला.
कै. गणेश विश्वनाथ हुलावळे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सामाजिक कार्य, शैक्षणिक प्रगती व युवकांमध्ये प्रेरणादायी योगदान यासाठी सुतार यांची निवड करण्यात आली. उपस्थितांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले.
याशिवाय शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. रात्री विठ्ठल रुख्मिणी भजनी मंडळ यांच्या वतीने हरिजागराचे सादर करण्यात आले. भक्तिमय वातावरणात नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
शिवशंकर तरुण मंडळ व कार्ला ग्रामस्थ यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati ST Bus Accident : अमरावतीत भीषण अपघात! एसटी महामंडळाच्या बसची ऑटोला धडक, पाच जणांचा मृत्यू, दोघे गंभीर...

19 February Holiday : 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या अधिकृत माहिती

T20 World Cup मधून बाहेर गेलेच, पण ऑस्ट्रेलिया आता ऑलिम्पिकलाही मुकणार? न्यूझीलंड कागांरूंचा बिघडवणार खेळ

"शेवटच्या दिवशी मेघाने..." बिग बॉस मराठी पहिल्या सीझनच्या विनरविषयी आस्तादचा धक्कादायक खुलासा

मालिकेने निरोप घेताच नवी सुरुवात; लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची लगीनघाई; ग्रहमखचे फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT