पिंपरी-चिंचवड

लोणावळा महाविद्यालयात क्रीडा महोत्सवास सुरुवात

CD

लोणावळा, ता. ५ : लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संचालित डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्री. एस. जी. गुप्ता वाणिज्य व श्री. एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरुवात झाली.
महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू केतकी बकोरे यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
क्रीडाभावना, जिद्द आणि संघभावना यांचे उत्कृष्ट दर्शन यावेळी घडले. विद्यार्थ्यांच्या खेळातील कामगिरीचे कौतुक करत क्रीडा उपक्रमांमुळे शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे मत केतकी बकोरे यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी विद्यार्थ्यांना क्रिकेटसोबतच ॲथलेटिक्ससह इतर विविध क्रीडा प्रकारांमध्येही सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महाविद्यालयाच्या ज्युनिअर व सीनियर विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभाग, क्रीडा महोत्सव समन्वयक तेजस भांगरे तसेच क्रीडा समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

ही पाकड्यांची लायकी! T20 World Cup संघातील खेळाडूचे हॉटेलमधील महिला कर्मचारीशी गैरवर्तन; तिने आरडाओरडा केला म्हणून वाचली...

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या ४ उमेदवारांनी भरला अर्ज

Pune Property Prices : पुणेकरांना धक्का ! घरे होणार महाग, शहर आणि ग्रामीण भागातील रेडीरेकनर दरात तब्बल 'इतक्या' टक्क्यांची वाढ ?

Post Holi Detox: होळीनंतर शरीर डिटॉक्ससाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

SCROLL FOR NEXT