पिंपरी-चिंचवड

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मासे वाहतुकीचा ट्रक पलटी

CD

लोणावळा, ता. १३ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर शुक्रवारी (ता. १३) सकाळी अमृतांजन ब्रिजजवळ मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने काहीकाळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. या अपघातात ट्रकमधील दोघेजण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने मासळी घेऊन निघालेल्या भरधाव ट्रकच्या (एपी १६ टीएफ ३३७९) चालकाचे अमृतांजन पुलाजवळ तीव्र उतार व वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक कठड्यास धडकून मार्गावर उलटला. या अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलिस (बोरघाट), डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच मृत्युंजय देवदूत पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, ट्रक हटविण्याचे काम सुरू असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काहीकाळ ब्लॉक घेण्यात आला. वाहतूक लोणावळामार्गे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली होती. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करत क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया सुरू केली. क्रेनच्या मदतीने ट्रक हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली असून, सध्या वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT