पिंपरी-चिंचवड

वृद्ध मातांसोबत महिला दिन साजरा

CD

लोणावळा, ता. १४ : स्काऊट गाइड फेलोशिप लोणावळा गिल्ड यांच्या वतीने वलवण येथील हरी गोविंद वृद्धाश्रमात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ महिलांना फळांचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी (ता. १३) आयोजित या उपक्रमामध्ये लोणावळा गिल्डच्या सदस्यांनी वृद्ध मातांप्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. तसेच वृद्ध मातांशी संवाद साधत त्यांच्यासोबत काही क्षण घालवून आपुलकीची भावना व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला रत्नप्रभा गायकवाड, हेमलता शर्मा, अंबिका गायकवाड, पूर्वा गायकवाड आणि सुनील शिंदे यांची उपस्थिती लाभली. लोणावळा गिल्डच्या सदस्यांच्या वतीने वृद्धाश्रमातील महिलांचा सन्मान करण्यात आला. समाजात ज्येष्ठ नागरिकांप्रति विशेषतः ज्येष्ठ महिलांप्रति आदर, संवेदनशीलता वाढावी आणि त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

SCROLL FOR NEXT