पिंपरी-चिंचवड

लोणावळ्याच्या विकासासाठी सुधारित आराखड्याची मागणी

CD

लोणावळा, ता. १५ : लोणावळा शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळे पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व पार्किंग व्यवस्था, पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन शहराचा सर्वसमावेशक आणि आधुनिक विकास आराखडा तयार होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषदेच्या विकास आराखड्याचे पुनरावलोकन करून सुधारित विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नासीर शेख यांनी केली आहे. नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मुख्याधिकारी अशोक साबळे यांना निवेदन देत चर्चा केली. यावेळी प्रफुल राजपूत, अभय परदेशी, पुजा सुशील गुप्ता, रजीन शेख, ईशान गुप्ता आदी उपस्थित होते. दरम्यान, या संदर्भातील विषय नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडला जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी दिले.
---

Thalapathy Vijay: थलापती विजयच्या दारात सत्तेची ‘ऑफर’! भाजप म्हणते उपमुख्यमंत्री व्हा, पण विजयची नजर थेट मुख्यमंत्रिपदावर?

Cyber Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहीतेचा छळ; संग्रामपूरमध्ये धक्कादायक प्रकार

"आम्हाला आतातरी मूल नकोय" शुभविवाह फेम अभिनेत्रीचा खुलासा; कारण सांगताना म्हणाली..

फक्त 50 हजार रुपयांत स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; खरेदीसाठी लागल्या रांगा, पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकवर

Summer Health Tips: उन्हाळा आला…आरोग्याची काळजी घ्या! तब्येत सांभाळण्यासाठी काय खावं, काय टाळावं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT