पिंपरी-चिंचवड

लोणावळ्यात पर्यटकांचा कल वाढू लागला

CD

लोणावळा, ता. १७ : शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्याने लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. राज्यभरात उकाडा वाढत असल्यामुळे पर्यटकांचा कल जलपर्यटनाकडे वळत असून, या परिसरातील विविध पर्यटनस्थळे गर्दीने फुलू लागली आहेत.
मुंबईपासून जवळ असल्याने अनेक मुंबईकर शनिवार-रविवार सुटीचा आनंद लुटण्यासाठी लोणावळा-खंडाळ्याकडे धाव घेत आहेत. मागील आठवड्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाल्याने येथील हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि खासगी बंगले जवळपास फुल्ल झाले. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी मावळ तालुक्यातील पवना धरण परिसराला विशेष पसंती मिळत आहे. त्याचप्रमाणे कार्ला येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वॉटर पार्क, बोटिंग क्लब तसेच लोणावळ्याजवळील खासगी जलक्रीडा केंद्रांवरही पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

सावधानता आवश्यक
उन्हाच्या तीव्रतेमुळे पर्यटकांनी पाणवठ्यांवर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या महिनाभरात मावळ तालुक्यात विविध ठिकाणी पाण्यात बुडून सुमारे १३ जणांचा मृत्यू झाला आहे. पवना धरण, जाधववाडी, वळवण धरण तसेच खासगी जलतरण तलावांमध्ये अतिउत्साहामुळे अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. अपघात टाळण्यासाठी खासगी नौकानयन केंद्रे, हॉटेल व रिसॉर्ट्समधील जलतरण तलावांवर जीवरक्षक नेमणे आवश्यक आहे. तसेच पाण्याची खोली किंवा परिस्थितीची माहिती नसताना पाण्यात उतरणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

‘‘मागील आठवड्यात येथे सुमारे ९० टक्के बुकिंग झाले होते. सध्या अंदाजे ३० टक्के बुकिंग असून, परीक्षा संपल्यानंतर आगामी काळात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पर्यटकांकडून जलविहार, नौकानयन केंद्रे आणि वॉटर पार्कला विशेष पसंती दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
- साहिल भालेराव, व्यवस्थापक, एमटीडीसी पर्यटक निवास, कार्ला

‘‘सुट्ट्यांमुळे पुढील आठवडाभर पर्यटकांची वर्दळ कायम राहण्याची शक्यता असून, बहुतांश हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये शनिवार-रविवारचे बुकिंग जवळपास पूर्ण झाले आहे.
- आशिष खंडेलवाल, हॉटेल व्यावसायिक

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

SCROLL FOR NEXT