पिंपरी-चिंचवड

लोणावळ्यात संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा

CD

लोणावळा, ता.११ : संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांच्या ६७६ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येथील शिंपी समाज ट्रस्ट यांच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडले.
भांगरवाडी येथील श्री लक्ष्मीनारायण गणपती मंदिर परिसरात झालेल्या या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांसह ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच लोणावळ्यातील रेल्वे विभागाच्या श्री संत नामदेव महाराज उद्यानातील नामफलक सुशोभीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला. विविध वयोगटांसाठी खेळ तसेच मनाचे श्लोक, महालक्ष्मी अष्टक, कालभैरव अष्टक आणि श्रीसूक्त पठण स्पर्धा झाल्या.
समाजप्रबोधनपर व्याख्यानात माऊली दाभाडे यांनी मार्गदर्शन केले. संत नामदेव महाराजांच्या भक्ती, समता, मानवता आणि सामाजिक ऐक्याच्या विचारांवर प्रकाश टाकला. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मिलिंद चिंबळकर, रमेश पिसे, रमेश बारटक्के, कल्पना कल्याणजी यांच्यासह शिंपी समाज ट्रस्टच्या पदाधिकारी व समाजबांधवांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Crime: प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार, निर्जन बंगल्यात नेत कृत्य; तीन जण ताब्यात

MHADA House: म्हाडाचं घर स्वस्तात मिळणार, घरांच्या किंमती होणार कमी, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

Marathi News Live Updates : गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

Rasalgad Fort History and Tourism : स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचा जिवंत साक्षीदार! शिवकालीन दुर्गचे पर्यटकांना आकर्षण, निसर्गरम्य रसाळगडावर मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT