पिंपरी-चिंचवड

भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचे नियोजन

CD

लोणावळा, ता. ३ : आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेहेरगाव, कार्ला येथील आई एकवीरा देवी गडावरील विविध व्यवस्थांची श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. नवरात्रोत्सवाच्या काळात राज्यभरातून तसेच परराज्यांतून लाखो भाविक आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विविध सुविधांचा आढावा घेण्यात आला.

देवस्थानचे प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश म्हात्रे, अध्यक्ष दीपक हुलावळे, वरिष्ठ उपाध्यक्ष मारुती देशमुख, उपाध्यक्ष सागर देवकर, सचिव नवनाथ देशमुख, सहसचिव महेंद्र देशमुख, खजिनदार संजय गोविलकर, सहखजिनदार विकास पडवळ, विश्वस्त तथा सरपंच अर्चना देवकर आदी उपस्थित होते. नवरात्रोत्सव काळात गडावर होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन दर्शन रांगा, भाविकांची सुरक्षित हालचाल, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, वाहतूक नियोजन, पार्किंग तसेच इतर मूलभूत सोयी-सुविधांबाबत विश्वस्तांनी पाहणी केली. गर्दीच्या काळात भाविकांना शिस्तबद्ध व सुरक्षितपणे दर्शन घेता यावे, यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. या वेळी देवस्थानच्या विश्वस्तांनी गडावरील विविध ठिकाणांची पाहणी करून संबंधित व्यवस्थांचा आढावा घेतला. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे. नवरात्रोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा आणि भाविकांना श्रद्धेने देवीचे दर्शन घेता यावे, यासाठी ट्रस्टकडून नियोजनाला गती देण्यात आली आहे.

उपाययोजना वेळेत पूर्ण करणार
‘‘आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरक्षित, सुरळीत आणि समाधानकारक दर्शन मिळावे, हा ट्रस्टचा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करण्यात येतील,’’ अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी दिली.


छायाचित्र: LON26B06088/06089

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Hike: पेट्रोल ₹5 तर डिझेल 3 रुपयांनी महाग! नवे दर लागू; महाराष्ट्रात 1 लिटर आता कितीला?

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

‘सोबत राहा, महिन्याला स्टायपेंड देतो’; विवाहित निर्मात्याची रेणुका शहाणेंना विचित्र ऑफर, प्रस्ताव ऐकून अभिनेत्रीला बसला धक्का

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाला शेकापचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT