पिंपरी-चिंचवड

ताम्हिणी घाटात रानमेव्याची प्रवाशांना गोडी

CD

माले, ता. २२ : ताम्हिणी घाट परिसरातील आदिवासी कातकरी समाजातील नागरिक सध्या आमगुळे या रानमेव्याची विक्री करीत आहेत. पर्यटक तसेच पुणे-कोलाड महामार्गावरून प्रवास करण्यांना रानमेव्याची गोडी लागली आहे.
रानमेव्याच्या विक्रीमुळे आदिवासींच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हरभऱ्याच्या घाटीसारखा आकार असलेली ही आमगुळे चवीला आंबट, तुरट आणि किंचित गोड लागतात.
ताम्हिणी, सारोळे आणि निवे परिसरातील पुणे-कोलाड महामार्गालगतच्या जंगलातून मोठ्या पानांच्या घडीत ही आमगुळे गोळा केली जातात.
स्थानिक कातकरी बांधव रानात मेहनतीने जमा केलेल्या सुमारे २५ ते ३० आमगुळे केवळ २० रुपयांना विक्रीस ठेवत आहेत. हंगामी स्वरूपाचा हा रानमेवा ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तसेच पर्यटकांकडून आवडीने घेतला जातो.
आमगुळे (रानमेवा) खाण्याचे परंपरागत व आरोग्यदायी फायदे आमगुळे चवीला आंबट-तुरट असल्याने लाळ व पाचक रसांची निर्मिती वाढते, त्यामुळे भूक लागते व पचन सुधारते. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते. त्यामुळे ग्रामीण भागात हा रानमेवा आवडीने खाल्ला जातो. तोंडाची चव सुधारते, रानात नैसर्गिकरीत्या उगवलेले असल्याने त्यात सूक्ष्म पोषक घटक असतात. आदिवासी समाजात आमगुळे थकवा कमी करण्यासाठी व शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी खाल्ले जाते. आमगुळे मर्यादित प्रमाणातच खावीत. गर्भवती महिला किंवा पचनाच्या गंभीर तक्रारी असतील तर सेवन टाळावे.
01315

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

SCROLL FOR NEXT