पिंपरी-चिंचवड

चऱ्होलीतील पदपथांवर अतिक्रमण

CD

मोशी, ता. १० : चऱ्होलीतील पदपथांवर बांधकाम व्यावसायिकांनी टाकलेले साहित्य, विक्रेत्यांची दुकाने त्यामुळे नागरिकांना यांमुळे पदपथाचा नागरिकांना वापर करता येता नाही, व त्यांना भररस्तावरून चालावे लागत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून चऱ्होलीसह, गावठाण, चोविसावाडी, काळजे वस्ती, पठारे वस्ती आदी भागांत विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून अनेक रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये मोशी प्राधिकरण ते खडीमशीन रस्ता मार्गे चोविसावाडी, बीआरटी रस्ता, गावठाण यांचा समावेश आहे.

या रस्त्याच्या दुतर्फा पदपथ तयार करण्यात आलेली आहेत. पदपथांवर सुंदर असे पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत. दुतर्फा विद्युत खांब उभे करण्यात आले असून त्यावर एलईडी दिवे बसविण्यात आलेले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पदपथांवर येथील स्थानिक विक्रेत्यांनी फळे, भाजी, गृहोपयोगी वस्तू आदींचे व्यवसाय उभारलेले आहेत. तर काही ठिकाणी या पदपथांवरील पेव्हिंग ब्लॉक निघालेले आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना भर रस्त्यामधून चालावे लागत आहे. नागरिकांकडून पेव्हिंग ब्लॉक व अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs NZ: पाकड्यांशी भिडायला किवींनी संघात १, २ नव्हे तर ३ बदल केले, पण पावसाने सगळे गणितच बिघडवले! आता पुढचे समीकरण काय?

Pune Traffic : सायलेन्सर व ड्रिंक ॲण्ड ड्राईव्हविरोधात वाहतूक शाखेची कारवाई; ३४८ बुलेटस्वरांकडून तीन लाख ३४ हजार रुपयांचा दंड वसूल

Trump Tariff: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डोनाल्ड ट्रम्प भारताकडून किती टॅरिफ आकारणार? हा कर फक्त १५० दिवसांसाठी का लादला?

२०२४ ला डेटिंगची चर्चा, २०२५ मध्ये नातं जगजाहीर; आता शिखर धवनने आयरिश प्रेयसीसोबत लग्न केलं, सोफी शाइन आहे तरी कोण? पाहा फोटो

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; तासन् तास उशिरा धावतात पॅसेंजर गाड्या; प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण

SCROLL FOR NEXT