पिंपरी-चिंचवड

शहरातील शाळांसमोरील धोकादायक होर्डिंग काढा

CD

मोशी, ता. २२ : रावेत येथे होर्डिंग्ज पडल्याची दुर्घटना घडली व त्यामध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. या धर्तीवर अशी घटना घडू नये यासाठी शहरातील शाळांसमोरील धोकादायक होर्डिंग ताबडतोब काढावेत, छोटे-मोठे अनधिकृत फ्लेक्स जे लावत असतील त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी चिखली, मोशी, पिंपरी-चिंचवड शहर हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने नुकतीच महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मागणी करण्यात आली असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सांगितले.
नुकतेच रावेत येथे होर्डिंग्ज पडल्याने निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. शहरातील बऱ्याच लहान मुलांच्या शाळेच्या समोर तसेच शाळेच्या बस ज्या ठिकाणी उभ्या राहतात अशा ठिकाणी खूप मोठे होर्डिंगचे सांगाडे उभे केलेले आहेत, ही बाब अत्यंत धोकादायक आहे. या होर्डिंगसाठी कोणी व कशी परवानगी दिली हे अनाकलनीय आहे.
शहरातील आशा सर्वच शाळेसमोर असणारे होर्डिंग त्वरित काढून घ्यावेत, शहरातील जे नागरिक, राजकीय पक्षाचे नेते, छोटे मोठे अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स लावतील त्यांच्यावर कारवाई करून आशा राजकीय पक्षांच्या नेत्यांना निवडणूक लढविण्यास प्रतिबंध करता येईल का, अशाप्रकारे काही करता येईल का, यावर विचार व्हावा. कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता असे सर्व होर्डिंग काढून शहराचे विद्रूपीकरण थांबवावे, अशी मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT