पिंपरी-चिंचवड

पर्यावरणदिनानिमित्त वृक्षारोपण, जनजागृती

CD

मोशी, ता. ६ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करीत मान्यवर वृक्षप्रेमींच्या हस्ते मोशीतील संतनगर मित्र मंडळ, इंद्रायणी सेवा संघ व भूगोल फाउंडेशनच्या वतीने संतनगर येथील हनुमान मंदिर परिसरात वृक्षारोपण व जनजागृती करून पर्यावरणदिन साजरा करण्यात आला.
या वेळी माजी नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, सामाजिक कार्यकर्ते योगेश, लोंढे, प्राचार्य शिवलिंगजी ढवलेश्वर, रमेश तोत्रे, अनिल कातळे, भूगोल फाउंडेशनचे संस्थापक विठ्ठल वाळुंज आदी उपस्थित होते. या वेळी महिलांच्या हस्ते वृक्षांची पूजा करून मान्यवर, महिला व नागरिकांच्या हस्ते वड, पिंपळ, बेल, फणस, पारिजातक,अर्जुन, जास्वंद, चाफा, आपटा, कण्हेरी, तगर, कदंब, बकुळ, टिकोमा अशा विविध प्रकारचे देशी आयुर्वेदिक व फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्या अगोदर मंडळाचे अध्यक्ष श्री विठ्ठल नाना वाळुंज यांनी आपण गेल्या पंधरा वर्षांपासून करीत असलेले वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, गड किल्ले स्वच्छता व संवर्धन, नदी स्वच्छता मोहीम, प्लॅस्टिक मुक्ती, पर्यावरण वाचविण्यासाठी जनजागृती, समाजप्रबोधन, पर्यावरण पूरक गणपती उत्सव, शिवजयंती, नवरात्र उत्सव , दीपोत्सव असे कार्यक्रम याविषयी माहिती देऊन याची सुरुवात स्वतः पासून करण्याचे आवाहन केले. विलास मडीगेरी, प्रा. शिवलिंग ढवलेश्वर व रमेश तोत्रे यांनी आपली वसुंधरा व पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षांचे काय महत्त्व आहे हे विविध दाखले देऊन पटवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT