पिंपरी-चिंचवड

तुंबलेल्या गटाराची दुरुस्ती करण्याची मागणी

CD

मोशी, ता. ६ ः साधू वासवानी शाळेलगतचे एक गटार तुंबली आहे. त्यामुळे येथे असलेल्या खड्डेमय रस्त्यावर हे दुर्गंधीयुक्त पाणी साठून राहत आहे. यामुळे हे गटार त्वरित दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक ६ मधील साधू वासवानी शाळेसमोरील हे गटार तुंबल्याने शाळा ते ट्रॅफिक पार्क पर्यंतच्या नागरिकांच्या घरापर्यंत जाणारे हे गटारातील पाणी रस्त्यावर वाहून येत आहे. त्यामुळे येथे असलेल्या खड्डेमय रस्त्यावर हे पाणी साचत आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. यामुळे हे गटार तत्काळ साफ करण्याची मागणी करण्यात येत आहे. हे तुंबलेले गटार साफ करून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढेल. तसेच, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे तुंबलेले गटार तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी सचिन बोराटे, दीपक सुतार, मनोज पाटील आदी वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी सांडपाणी जाण्यासाठी असलेले गटार कचरा व मातीने तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरासमोरून वाहत आहे. त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
- संजय आहेर, मोशी प्राधिकरण, माजी स्वीकृत नगरसदस्य,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT