मोशी, ता. १३ ः येथील पुणे-नाशिक महामार्गावरील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समिती ते टोल नाका दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या आठ ते दहा चेंबरची झाकणे गायब झाली आहेत. काही झाकणे तुटल्याने अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.
या बिगर झाकणाच्या चेंबरमुळे पादचारी नागरिक व वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने त्वरित या झाकणांची दुरुस्ती करून घ्यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचत असते. पाण्यामुळे नागरिकांना या ठिकाणी असलेले चेंबर दिसत नाहीत. त्यामध्ये चेंबरला झाकण नसल्याने एखादी व्यक्ती अथवा वाहन अडकून अपघात होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने चेंबरची सर्व झाकणे त्वरीत बदलून, रस्ता सुस्थितीत करावा. अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.