पिंपरी-चिंचवड

आमची कुणीतरी सुटका करेल का ?

CD

श्रावण जाधव ः सकाळ वृत्तसेवा

मोशी, ता. २७ : लोखंडी धारदार दुभाजकामध्ये आमचा जीव गुदमरतोय हो... आमची वाढ खुंटते आहे हो...
कुणी तरी सुटका करेल का आमची... अशी जणू आर्त हाक मोशी प्राधिकरणाच्या स्पाईन रस्त्यावरील लोखंडी रस्ता दुभाजकामध्ये रुतलेले अनेक पिंपळाचे वृक्ष देत आहेत. संपूर्ण सृष्टीत नवचैतन्याची पेरणी करणाऱ्या वसंत ऋतुच्या आगमनाच्या काळातच त्यांची घुसमट होत आहे.
महापालिकेच्यावतीने येथील स्पाईन रस्त्यावरील लोखंडी रस्ता दुभाजकांच्या मधोमध काही वर्षांपूर्वी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यथावकाश त्यांची वाढ होऊन ती मोठी होतील आणि लोखंडी धारदार दुभाजकामध्ये अडकतील हे मात्र त्यावेळी वृक्षारोपण करणाऱ्यांच्या लक्षात आले नाही आणि झालेही तसेच. महापालिकेने राजा शिवछत्रपती चौक ते साने चौक यादरम्यान असलेल्या स्पाईन रस्त्यावरील रस्ता दुभाजक आणि पदपथांच्या कडेला शेकडो वृक्षांची लागवड केली. मात्र सध्या काही वृक्ष धारदार रस्ता दुभाजकामध्ये फसले आहेत; तर काही वृक्षांभोवती जाहिरातींचे फलक लटकले आहेत. तर काहींवर विविध प्रकारच्या केबल लोंबकळताना दिसत आहेत. तर काही वृक्ष पाण्याअभावी सुकले आहेत. परंतु महापालिकेच्या उद्यान विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत उद्यान अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

वाढीवर विपरित परिणाम
चैत्र महिन्याची सुरुवात होत असून सध्या वृक्ष, पक्षी आणि मानवाला सुद्धा प्रसन्न ठेवणाऱ्या वसंत ऋतूचे आगमन होत आहे. याच महिन्यात वृक्षांना नवीन कोवळी पालवी फुटते. मात्र दुभाजकांमध्ये अडकलेल्या वृक्षांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत असल्याचे वृक्षप्रेमींचे म्हणणे आहे. विद्रूपीकरण देखील होत आहे. मात्र, उद्यान विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षप्रेमी दत्तात्रेय राठवडे, साहेबराव गावडे, सुनील आचार्य, लता गायकवाड आदींसह स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.


काही वर्षांपूर्वी मोशी, चिखली प्राधिकरण परिसरासह स्पाईन रस्ता येथे उद्यान विभागाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यात आले. मात्र लोखंडी रस्ता दुभाजकामध्ये जे वृक्ष लावण्यात आले. त्यांची आता मोठी वाढ झाली आहे. उद्यान विभागाने याची दखल घेऊन या वृक्षांना मोकळे करावे.
- विठ्ठल वाळुंज, वृक्षप्रेमी, मोशी प्राधिकरण
PNE25V01337

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT