पिंपरी-चिंचवड

मोशीतील सिल्व्हर ओक सोसायटीचा पाणीपुरवठा बंद

CD

मोशी, ता. २८ : सदनिकेचा मालमत्ता कर भरला नाही म्हणून मोशीतील सिल्व्हर ओक सोसासायटीचेच नळजोड महापालिकेच्यावतीने तोडण्यात आल्याचा प्रकार घडला. संपूर्ण सोसायटीचेच पाणी बंद केल्याने स्थानिक रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. सध्या येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
सिल्व्हर ओक सोसायटीत एकूण २१० सदनिका असून त्यांच्यासाठी एकूण बारा नळजोड आहेत. हे बाराच्या बारा नळजोड तोडण्यात आलेले आहेत. त्यामागे येथील सदनिकाधारकांनी स्वतःच्या सदनिकेचा मालमत्ता कर भरला नसल्याचे कारण दिले जात आहे. मात्र सदनिकांचे क्षेत्र कमी असताना मालमत्ता कर अधिक येत आहे, अशी येथील सदनिकाधारकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी महापालिकेकडे सदनिकांचे क्षेत्र मोजून त्याप्रमाणे मालमत्ता कर आकारणी करावी. त्याप्रमाणे ते लोक भरायला तयारही आहेत. आम्हाला क्षेत्र मोजलेले एक पत्र द्या आणि त्याप्रमाणे कर आकारणी करून द्या. आम्ही तो १०० टक्के कर भरतो, अशी रहिवाशांची मागणी आहे.

पूर्वकल्पना न देता कारवाई...
सोसायटीतील ५० टक्के सदनिका धारकांनी शंभर टक्के कर भरलेला आहे. महानगरपालिकेकडून त्याबाबत रीतसर नोटीस देणे आवश्यक होते. परंतु कुठलीही नोटीस न देता त्यांचेही नळजोड तोडले आहेत. सोसायटीच्या सदस्यांनी एकत्रित येऊन महापालिकेतील अधिकाऱ्याला जाब विचारला. परंतु सर्वप्रथम थकीत कर भरा. त्यानंतरच आम्ही तुमचे नळजोड जोडून देऊ, अशी बोळवण अधिकाऱ्याने केली. त्यामुळे सोसायटीचे अध्यक्ष अविनाश फणसे, सचिव गणेश राऊत, सभासद शैलेश ढवळे, संदीप गाडे, अमित तांबे, नेहा गारगोटे, उर्मिला दंडवते आदींसह २१० सदनिकाधारक सभासद सर्व मार्गांनी प्रयत्न करत आहेत.

राखीव टाकीतील पाणीही संपले
सोसायटीत आगीसारखी एखादी दुर्घटना घडल्यास त्यावर तातडीचा उपाय म्हणून अग्निशमन दलासाठी पाण्याची राखीव टाकी आहे. मात्र, टाकीमधीलही पाणी संपले आहे. अचानक जर येथे आग लागली; तर काय करायचे असाही गंभीर प्रश्न रहिवाशांसमोर निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

Cruise Accident: आईने मुलाला लाइफ जॅकेटमध्ये कवटाळून ठेवले... पण दोघांचाही श्वास थांबला! क्रूझ दुर्घटनेत हृदय पिळवटून टाकणारा क्षण

पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

SCROLL FOR NEXT