पिंपरी-चिंचवड

श्री भैरवनाथ विद्यालयाचे प्रश्नमंजूषा स्पर्धेत यश

CD

मोशी, ता. १४ ः चिंचवड येथील रसिकलाल धारिवाल इंटरनॅशनल स्कूलमध्ये १२ व १३ डिसेंबरला ५३वे पिंपरी-चिंचवड तालुकास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शन झाले. पुणे जिल्हा परिषद, पुणे-माध्यमिक शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघ व पिंपरी-चिंचवड विज्ञान विषय संघ यांच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनात भोसरीतील श्री भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या प्रदर्शना अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत इयत्ता नववी ते बारावी (गट क्रमांक २)मध्ये श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोसरी येथील इयत्ता बारावीमधील शिवम जाधव आणि इयत्ता नववीमधील मयूरी दौंडकर यांनी उत्कृष्ट ज्ञान, तर्कशक्ती व संघभावनेच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकाविला.
या विज्ञान प्रदर्शन व प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात पिंपरी-चिंचवड शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या यशाबद्दल श्रीरंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ, आणे या संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश बोरा, उपाध्यक्ष ॲड. जितेंद्र बोरा, प्राचार्य नवीनकुमार आहेर, उपप्राचार्य संजीवकुमार राणे, उपमुख्याध्यापक दीपक बागूल, पर्यवेक्षक प्रमोद थोरात, पर्यवेक्षिका सुनंदा जाधव तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Rate Today : सोने -चांदी दरात घसरण, चांदी तब्बल ५ हजारांनी उतरली तर सोने १२०० रुपयांनी घसरले

मुलुंडमध्ये रस्त्याच्या कामावेळी पुन्हा दुर्घटना, लोखंडी पिलर कारवर कोसळला

Pandharpur Corridor Project: पंढरपूर कॉरिडॉरची अर्थसंकल्पात घोषणा शक्य; पूर्वतयारी पूर्ण, ४ हजार कोटींच्या प्रकल्पाने बदलणार पंढरपूरचे रूप!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६१४ ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्तीवर न्यायालयीन स्थगिती

Nafisa Begum Sattar Passes Away : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसाबेगम यांचे निधन; आज सिल्लोडमध्ये होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT