पिंपरी-चिंचवड

अमली पदार्थांविरोधात शालेय विद्यार्थ्यांत जनजागृती

CD

मोशी, ता. ७ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री नागेश्वर विद्यालय, मोशी व भाग शाळा, चिखली येथे नुकतेच अमली पदार्थांना आळा घालण्यासाठी विशेष जनजागृती व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी औंध जिल्हा रुग्णालय येथील डॉ. नंदकुमार सातपुते व धनंजय डोंगरदिवे यांनी इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शासकीय धोरणानुसार अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनाधीनतेचे धोके व व्यसनमुक्तीचे मार्ग याबाबत मार्गदर्शन केले.
अमली पदार्थांचे व्यसन हे शरीरासोबतच कुटुंब व समाजालाही पोखरते. विद्यार्थ्यांनी योग्य वेळी सजग राहून व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे, असे डॉ. सातपुते यांनी सांगितले. तर व्यसनमुक्त जीवन हीच उज्ज्वल भविष्यासाठीची खरी गुरुकिल्ली आहे, असे डोंगरदिवे यांनी नमूद केले.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचे फलक हातात घेऊन विद्यालय परिसरात जनजागृती फेरी काढली. प्राचार्य रामदास सानप यांनी प्रास्ताविक केले. तर शरद वाजे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT