मोशी, ता.१४ : मोशी प्राधिकरण परिसरात भटक्या श्वानांचा त्रास वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राधिकरणातील पेठ क्रमांक ६ मधील जलवायू विहार, जलकुंभ परिसरात दुचाकीस्वार तसेच चालण्याचा व्यायाम करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर श्वानांच्या झुंडी धावून जात असल्याच्या घटना घडत आहेत.
सायंकाळच्या वेळी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकावर सात ते आठ भटके श्वान भुंकत धावत गेली. घाबरलेल्या त्या नागरिकाने तातडीने पळ काढला. त्यातील चार ते पाच श्वान त्याच्या मागे धावू लागले. त्याचवेळी तेथून जात असलेल्या ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी प्रसंगावधान राखत श्वानांच्या दिशेने दगड भिरकावून त्यांना हाकलले. त्यामुळे त्यांची दिशा बदलली आणि त्या ज्येष्ठ नागरिकाची सुटका झाली. या घटनेनंतर परिसरातील व्यायामप्रेमींमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मोशी प्राधिकरण हा नियोजनबद्ध वसाहतींचा परिसर म्हणून ओळखला जात असला तरी येथेही भटक्या श्वानांचा त्रास वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे सकाळ-सायंकाळ चालणे, व्यायाम करणे सुरक्षित राहिले नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
दुचाकीवर प्रवास करताना तसेच फेरफटका मारण्यास निघालेल्या नागरिकांवर सायंकाळी या परिसरातील भटके श्वान धावून येतात. ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ही परिस्थिती धोकादायक बनली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.
- संदीप पाटील, दुचाकीस्वार
मोशी प्राधिकरण परिसरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पकड मोहीम राबवून त्यांच्यावर निर्बंध घालणे आवश्यक आहे.
- मंगेश शिंदे, पादचारी
MOS26B04277
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.