पिंपरी-चिंचवड

मोशी प्राधिकरणातील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्साहात

CD

मोशी, ता. २६ : प्राधिकरणातील पेठ क्रमांक चार येथील साईनाथ व श्रीराम मंदिर संस्थेच्या वतीने गुरुवारी (ता. २६) श्री रामनवमी निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी दिली.
या प्रसंगी संपूर्ण मंदिराला फुलांसह विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली होती. रांगोळ्यांच्या पायघड्या व भगवे ध्वज लावण्यात आले होते.
सकाळी चासकर परिवार यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यांनतर श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी फुलांनी सजविलेल्या पाळण्यासह जन्माचे पाळणे म्हटले. सायंकाळी महिला मंडळाच्या वतीने राम रक्षा पठण, संगीत भजनाने प्राधिकरणातील वातावरण भक्तिरसात रंगले. याशिवाय बालकांसाठी रामायण प्रश्नमंजुषा, कीर्तन आणि धार्मिक प्रवचन यांसारखे उपक्रमही घेण्यात आले. अध्यक्ष श्रीकांत सावंत, संभाजी राळे, शंकर मुळे यांसह सर्व पदाधिकारी, विश्वस्त व महिला भाविक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs MI Live: बापमाणूस सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा कर्णधार! हार्दिक पांड्या का नाही खेळला? रजत पाटीदारने टॉस जिंकला...

Pune News: पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात अव्यवस्थेचा कळस; प्रयोग रद्द करण्याची नामुष्की, ध्वनीव्यवस्थेत बिघाड अन् वातानुकूलित यंत्रणाही नादुरुस्त..

Nagpur Goa Shaktipeeth Highway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा व्हायरल; नेमका कसा असणार रूट?

कोण आहेत कीर्तना? २९ वर्षीय सर्वात तरुण मंत्री, हिंदीसह ५ भाषा येतात; विजय यांच्या मंत्रिमंडळातली एकमेव महिला

Crime: धक्कादायक! क्षुल्लक वादातून सुनेनं प्रसिद्ध डॉक्टर सासऱ्यांना संपवलं, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT