मोशी, ता.१ : एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्यावतीने आयोजित पाच दिवसीय सीबीएसई राष्ट्रीय एरोबिक्स आणि जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेचा दिमाखदार समारोप झाला. यजमान एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, चिखलीच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने फिटनेस एरोबिक्समध्ये सुवर्ण, तर ११ वर्षांखालील मुलांच्या संघाने ब्राँझपदक पटकावले.
एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले, डॉ. वृषाली भोसले, कार्यकारी संचालिका देवयानी भोसले, कार्यकारी संचालिका डॉ. ॲड. ऋतुजा भोसले, सल्लागार डॉ. अमय मारखापुरम यांच्या मार्गदर्शनातून ही स्पर्धा भरविण्यात आली. एरोबिक्स स्पर्धा चिखली येथे, तर जिम्नॅस्टिक्स स्पर्धा लोणावळा येथे पार पडली. उद्घाटन सोहळ्याला सीबीएसई पुणे प्रादेशिक कार्यालयाचे संचालक डॉ. आर. के. बलानी प्रमुख पाहुणे म्हणून तर समारोपाला डॉ. विनायक वराडे, नाना पाटील आणि तान्या पाटील उपस्थित होते.
एरोबिक्स स्पर्धेत देशभरातील सीबीएसई संलग्न १२३ शाळांमधील १,२०० हून अधिक विद्यार्थी, प्रशिक्षक आणि अधिकारी सहभागी झाले. जिम्नॅस्टिक्स स्पर्धेला एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, रहाटणीच्या प्रतिनिधी जयश्री व्यंकटरमण, एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे संचालक डॉ. राजीव कुमार गर्ग यांची उपस्थिती लाभली.
या स्पर्धांच्या आयोजनात आयएसएएएफचे अध्यक्ष डॉ. संतोष खैरनार, तांत्रिक निरीक्षक डॉ. सी. रामासुब्रमण्यम, स्पर्धा निरीक्षक डॉ. राजीव पांडे, तांत्रिक प्रमुख डॉ. रोशनी गाडगीळ, प्राचार्या डॉ. रश्मिरेखा साहा यांचे सहकार्य लाभले.
उत्कृष्ट सांघिक कामगिरी
यजमान एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, चिखलीच्या १९ वर्षांखालील सुवर्णपदक विजेत्या मुलांच्या संघात आयुष जाधव, अक्षीत शिबू, चेतन माजगे, आर्यन सावंत, सर्वेश बोरले, आरुष नरोडे, दर्श पाटील आणि समर्थ जाधव यांचा समावेश होता.
तर ब्राँझपदक विजेत्या संघामधून प्रत्युष जाधव, वरद अहेर, ओम जुनावणे, अर्णव पवार, कुशल सिंग, स्वरूप गुंजाळ, नैतिक परदेशी आणि उन्नत बनसोडे यांनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी केली.
अन्य निकाल प्रथम, द्वितीय, तृतीय यानुसार
११ वर्षांखालील मुली ः फ्लोअर एक्सरसाइज - अरना रॉय चौधरी (एच. एम. एज्युकेशन सेंटर) १०.४५ गुण. दिव्यांजली महांता (भुवनेश्वर मॉडेल पब्लिक स्कूल), दित्या निझावन (धारव हायस्कूल). अनइव्हन बार्स ः अरना रॉय चौधरी ८.२० गुण. अद्रिता सिंग (केंब्रिज स्कूल, नोएडा), व्हेरोनिका वर्मा (श्रीराम ग्लोबल स्कूल, लखनऊ). बीम ः मिशिका यादव (दिल्ली पब्लिक स्कूल) ९.९० गुण. अरना रॉय चौधरी, वान्या चंदोला (के. आर. मंगलम वर्ल्ड स्कूल, वैशाली). व्हॉल्ट ः अरना रॉय चौधरी १०.६५० गुण. काश्वी नारखेडे (ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, बेंगळुरू), मिशिका यादव, शनाया यादव (बिलाबाँग हाय इंटरनॅशनल स्कूल).