पिंपरी-चिंचवड

नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ, पूर्ण क्षमतेने प्रवाह

CD

रावेत, ता.२७ ः मुसळधार पावसामुळे आकुर्डी, रावेत आणि निगडी प्राधिकरण परिसरातील नाल्यांमध्ये पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या काही तासांतील संततधार पावसामुळे नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. मात्र, नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
‘‘आकुर्डी, रावेत आणि निगडी या भागात पाणी साचण्याचा धोका होता. मात्र, आरोग्य विभागाने वेळे काम पूर्ण केल्यामुळे कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. पुढील काही दिवसांतही पाऊस राहणार असल्याने महापालिका प्रशासनाने पाणी साचण्याच्या ठिकाणी सतर्क राहावे. तसेच कोणत्याही गैरसोयीपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी.’’, असे आवाहन नागरिकांनी केले आहे. तर पाऊस चालू असताना नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडू नये. गटार किंवा नाल्यांत कचरा न टाकता पाणी प्रवाह सुरळीत होईल, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

काय आहे परिस्थिती...
- आकुर्डी, रावेत आणि निगडी प्राधिकरणातील नाल्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ
- नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले, मात्र सफाईमुळे बहुतांश घरांत पाणी शिरण्याचा धोका टळला
- पाणी साचण्याच्या ठिकाणी प्रशासनाने सतर्क राहण्याची नागरिकांची मागणी
- आकुर्डीतील जय भवानीनगर, प्रभात कॉलनीजवळील नाल्यांचे पाणी काही झोपड्यात शिरल्याची तक्रार
- रावेत परिसरात नदीला मिळणाऱ्या छोट्या नाल्यांमुळे रस्त्यांवर पाणी साचले. वाहतूक संथगतीने चालू
- काही ठिकाणी बांधकामामुळे नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेल्याचे निदर्शनास
- निगडी प्राधिकरणामधील रामनगर, यमुनानगर, यशवंतनगरमध्ये काही ठिकाणी पाणी साचले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता दोन मिनिटांत दाखल होईल FIR, नागपूर पोलिसांनी AI च्या मदतीने विकसीत केली नवी प्रणाली..

Mumbai News: पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी? विरोधकांचा न्यायालयात युक्तिवाद

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

Nashik Gram Panchayat : सरपंच प्रशासकांना आर्थिक 'पॉवर' आहे का? नाशिकमधील ५८४ ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह

SCROLL FOR NEXT