निगडी, ता.१ ः आकुर्डी येथील उर्सुला शाळेसमोरच्या मुख्य रस्त्यावरील जलवाहिनीचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे रस्ता खड्ड्यांनी भरला आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी साचून चिखल होत असल्याने शेकडो विद्यार्थी, पालक आणि अन्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील हा संपूर्ण रस्त्यावर जलवाहिनीचे काम झाले होते. त्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. मात्र, शाळेच्या एका टोकाकडील रस्त्याचे डांबरीकरण झाले असून दुसऱ्या टोकाचा रस्ता अजूनही खड्ड्यांनी भरला आहे. तेथून येताना- जाताना दुचाकीस्वार घसरत आहेत. वाहतूकही मंदावत आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आकुर्डी परिसरातील ही नावजलेली शाळा आहे. येथे खूप दुरून विद्यार्थी येतात. मी सकाळी दुचाकीवरून मुलाला सोडायला येते. मात्र, रस्त्यातील खड्ड्यांमुळे अनेक अडचणी येतात. कधी कधी खड्ड्यांमुळे मुलाला शाळेला उशीर होतो. महापालिका प्रशासनाने या रस्त्याकडे त्वरित लक्ष देऊन त्याचे डांबरीकरण करावे.’’
- वैशाली थोरात, पालक
या रस्त्याशेजारी जुनी जलवाहिनी असून ती शाळेच्या भिंतीच्या कडेने आहे. ती दुसऱ्या बाजूने हलवावी लागणार आहे. रस्त्यावर रोलिंग करताना अडचण येत आहे. पाण्याचे जोड वरतीच असल्यामुळे तुटण्याची शक्यता आहे. दोन ते तीन दिवसांमध्ये ही जलवाहिनी हलविण्याचे काम केले जाईल. पाणीपुरवठा विभागाद्वारे मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे काम करताना अडचणी येत आहे. पावसाचे प्रमाण थोडे कमी झाल्यानंतर तातडीने खडी टाकून रस्ता वापरण्यायोग्य केला जाईल.
- महेश बरिदे, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा), ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.