निगडी, ता.५ : आकुर्डीतील बजाज कंपनी प्रवेशद्वार ते खंडोबा मंदिर चौक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे नागरिकांचे रोजचे हाल सुरू आहेत. त्याच्या निषेधार्थ घंटनाद आंदोलन करण्यात आले. रस्ते द्या, खड्डे नाही’ अशा घोषणा देत नागरिकांनी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला.
सुमित सोशल फाउंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्या दीपा काटे यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डी येथील बजाज ऑटो कंपनीच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले. रोजच्या प्रवासात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचे कानावर काही जात नाही. त्यामुळे आज घंटा वाजवून निदर्शने करण्यात आली, असे काटे म्हणाल्या. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालते. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
महापालिकेचे वाहतूक नियोजन विभागाचे अधिकारी सुनील पवार म्हणाले, ‘‘रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला गती दिली आहे. पावसामुळे कामे करण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र, लवकर काम पूर्ण केले जाईल. नागरिकांनी सहकार्य करावे.’’
PNE25V28992
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.