पिंपरी-चिंचवड

गळके छत, अंधारी खोली, असुरक्षित जागा

CD

रावेत, ता. १० : परिसरात मोठमोठ्या सोसायटी उभ्या राहत असताना येथील टपाल कार्यालय अजूनही जुनाट आणि पडक्या खोलीतून सुरू आहे. लोकसंख्येमुळे वाढलेली टपालसेवेची मागणी लक्षात घेता या कार्यालयाला नवीन जागा देण्यात आलेली नाही. परिणामी, नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सदर पोस्ट ऑफिसची खोली अत्यंत लहान आणि अपुरी आहे. तेथे पुरेशी आसन व्यवस्था नाही. पावसाळ्यात छत गळते, वीज आणि पंख्यांची योग्य सोय नाही, तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही ही जागा अपुरी आणि असुरक्षित आहे. काही वेळा ग्राहकांच्या रांगा लागतात. पण, कामे पूर्ण होण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते.

‘‘रावेतसारख्या मोठ्या परिसरात सुसज्ज टपाल कार्यालय नसणं दुर्दैवाचं आहे. आम्ही वारंवार तक्रार करूनही काहीच हालचाल होत नाही,’’ अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक स्नेहा देशमुख यांनी दिली.

दरम्यान, नवीन टपाल कार्यालयासाठी जागेचा प्रस्ताव सादर केला आहे की नाही, यासंबंधी अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, ‘‘स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देत नवीन आणि सुसज्ज पोस्ट ऑफिससाठी तातडीने उपाययोजना कराव्यात,’’ अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

PNE25V30179, PNE25V30180

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: लाडक्या बहिणींचा आत्मनिर्भरतेचा ‘फराळ’; योजनेच्या पैशातून महिलांचे उद्योग क्षेत्रात पाऊल

Best Places to Visit Diwali 2025: एक सण, सहा अनोख्या परंपरा; यंदाच्या दिवळीत द्या भारतातील या ठिकाणांना भेट

अनेकदा सांगूनही इथं का राहता? मध्यरात्री खोक्या भोसलेच्या कुटुंबावर हल्ला; कोयता, कुऱ्हाडीने मारहाण, ४ महिला जखमी

Latest Marathi News Live Update: अजित पवारांनी संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, यावर जगतापांनी बोलणं टाळलं

Balasaheb Solaskar: झेडपीत राष्ट्रवादीला २५ जागा मिळतील: सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर; आगामी निवडणुकांसाठी पक्षीय पातळीवर तयारी सुरू

SCROLL FOR NEXT