पिंपरी-चिंचवड

गणरायाच्या चरणी सामाजिक बांधिलकीची ‘सेवा’

CD

रावेत, ता. १६ ः लाडक्या गणेशाचे वाजत-गाजत स्वागत करण्यासाठी तरुणाईत उत्साह आता संचारु लागला आहे. रावेत आणि आकुर्डीतील मोरया ढोल-ताशा पथकही त्याला अपवाद राहिलेले नाही. मात्र, वाद्य वादनाच्या माध्यमामधून मिळणाऱ्या उत्पन्नामधून पथकातील गरजू मुलांसाठी यथाशक्ती मदत केली जात आहे.
पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, पिंपरी चिंचवड ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष विशाल मानकर, मोरया ढोल ताशा पथक संस्थापक जिग्नू भाट यांच्या हस्ते पथकाच्या वाद्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पथकाच्या सरावाला सुरुवात झाली. यावेळी पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील पथक प्रमुख उपस्थित होते.
पथकाकडून सदस्य वैभव भाट, रोहन बाटुंगे, राहुल सांगवे यांनी वैद्यकीय संदर्भात आर्थिक मदत केली. तर रोहित पोटे, शुभम कुंबरे यांना शिक्षणासाठी मदत करण्यात आली.
पथकाचे संस्थापक जिग्नू भाट म्हणाले, ‘‘गेल्या १४ वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात मोरया ढोल ताशा पथक गणेशोत्सवात वाद्य वादनाच्या माध्यमातून तसेच प्राप्त उत्पन्नामधून अनाथ आश्रम येथे गरजू मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली. यावर्षी पंधराव्या वर्षांत पदार्पण करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. यावर्षी नवीन काहीतरी पिंपरी चिंचवडकरांना ऐकण्याची संधी मिळेल.’’
पथक प्रमुख विनय भाट म्हणाले, ‘‘यंदाचे हे १५ वे वर्ष आहे. हे वर्ष स्वाभिमानाचे म्हणून साजरे करणार आहेत. प्रत्येक वर्षी पिंपरी चिंचवड आणि पुणे या शहरात वादन करतो. १५० मुले आणि मुली आहेत. त्यांचा सराव आजपासून सुरू झाला आहे. वादकांचा सर्व प्रकारचा खर्च आपण करतो.’’


मला गेल्या वर्षी मोरया ढोलपथकातर्फे शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली होती. त्यामुळे माझे बारावीचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत झाली.
- साहिल मोरे, ढोल वादक


NGI25B00650, NGI25B00651

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

SCROLL FOR NEXT