पिंपरी-चिंचवड

भक्ती-शक्ती ते चिंचवड स्टेशन रस्त्याची पुन्हा मलमपट्टी

CD

निगडी, ता. १८ : भक्ती-शक्ती चौक ते चिंचवड स्टेशन रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यांमुळे झालेली चाळण आणि तुटक्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या विषयावर ‘सकाळ’ने ठळक वृत्त प्रकाशित करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावर जाग आलेल्या महामेट्रो प्रशासनाने अखेर हालचाल केली असून, पेव्हरब्लॉक बसवून तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम हाती घेतले आहे.
या रस्त्यावर मागील काही महिन्यांत तीन ते चार वेळा दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र, प्रत्येक दुरुस्ती अवघ्या पंधरा दिवसांत ‘खड्ड्यांत’ जात आहे. आता पेव्हरब्लॉकच्या माध्यमातून उथळ मलमपट्टी करण्यात येत असून, लाखो रुपयांचा खर्च करून केवळ ठेकेदारांची झोळी भरली जात असल्याचा आरोप होत आहे.
वाहनचालक संतोष डाखमुरे म्हणाले, ‘‘या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात सकाळच्या वेळेत ट्रॅव्हल्स बस धावतात. त्यामुळे सकाळी कामावर जाताना यातून रस्ता शोधणे कठीण जाते. खड्ड्यांमुळे अपघाताची भीती वाटते. प्रशासनाने केवळ तात्पुरती मल्लमपट्टी न करता कायमस्वरुपी रस्ता खड्डेमुक्त करावा.’’
वाहनचालक स्वाती देशमुख म्हणल्या, ‘‘मी रोज कामाला याच रस्त्यावरून जाते. रोज खड्डे, आणि पुन्हा त्यावर मलमपट्टी असे किती वेळा सहन करावे? आम्ही कर भरतो, पण आमच्यासाठी दर्जेदार रस्ते मिळत नाहीत. हा फक्त खर्चाचा खेळ असल्याचे आम्हाला वाटते.’’

ही रस्ता दुरुस्ती पूर्वीच व्हायला हवी होती. पेव्हरब्लॉक हा तात्पुरता उपाय आहे. हे ठेकेदारांना फायदा करून देण्याचे साधन आहे. याचा लेखाजोखा पारदर्शकपणे जाहीर केला पाहिजे. किती टेंडर काढले गेले, किती कोटी रुपये खर्च झाले, दर पंधरा दिवसांनी रस्ता का खराब होतो? याची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे.
- दीपा काटे, सामाजिक कार्यकर्त्या, निगडी

मेट्रोच्या कामामुळे काही भागांत रस्त्यांचे नुकसान झाले आहे. पावासामुळे काम करता येत नव्हते, मात्र आता भक्ती शक्ती चौकापासून पवळे उड्डाणपूल, रुद्रा पार्किंग, बजाज गेट आणि खंडोबा चौकाशेजारील रस्त्यावर डांबर टाकण्यात आले आहे. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहेत. पावसाळ्यानंतर या रस्त्यांचे संपूर्ण डांबरीकरण करण्यात येईल.
- योगानंद ओटलोरी, अभियंता, महामेट्रो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Warning Nishikant Dubey: ‘’दुबे तुम मुंबई मै आजाओ.., समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें...’’ ; राज ठाकरेंचा कडक पलटवार!

Sangli Poisoning : कर्जबाजारी कुटुंबाने उचलेले टोकाचे पाऊल! विषप्राशनाने सासू-सुनेचा मृत्यू, वडीलांसह मुलाची प्रकृती गंभीर

Latest Marathi News Updates: राजकीय पक्षांच्या दबावापोटी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला - राज ठाकरे

सायलीने गड राखला पण TRP मध्ये 'येड लागलं प्रेमाचं' ने मारली बाजी; झी मराठीच्या 'कमळी'ने सगळ्यांना टाकलं मागे, वाचा संपूर्ण रिपोर्ट

JJ Hospital Case: धक्कादायक! जेजे रुग्णालयात विद्यार्थिनीचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, संतापजन कारण समोर

SCROLL FOR NEXT