पिंपरी-चिंचवड

रावेतच्या इको जॉगिंग ट्रॅकची देखभाली अभावी दुरवस्था

CD

रावेत, ता. ९ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे स्मार्ट सिटी अंतर्गत रावेत परिसरातील लोहमार्गालगत विकसित ‘इको जॉगिंग ट्रॅक’ ची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. ‘टर्फलेट’ अंतर्गत हरित क्षेत्राची वाताहत झाली आहे.
नागरिकांना व्यायामासाठी जागा असावी या हेतूने महापालिकेकडून हे ‘इको जॉगिंग ट्रॅक’ विकसित करण्यात आले. नवीन झाडांची लागवड करून परिसर सुशोभित करण्यात आला होता. मात्र, सध्या ट्रॅकवरील टर्फ तुटणे, जमिनीची पातळी खालावणे तसेच झाडांची निगा न राखल्याने परिसराची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या फिरण्यावर व व्यायामावर परिणाम होत आहे. अस्वच्छता आणि कचऱ्याचा साठा वाढल्याने आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. या जॉगिंग ट्रॅकच्या देखभालीसाठी कर्मचारी नसल्याने त्याचा गैरवापर आणि नुकसानीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महापालिकेने तातडीने ट्रॅकची दुरुस्ती करुन हरित क्षेत्राची देखभाल करावी आणि सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

रोज सकाळी इको जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यासाठी येतो. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र ट्रॅक आणि रस्त्यावर मोठ्या संख्येने गवत आणि इतर झाडे वाढल्याने चालण्यास अडचण येत आहे. सापासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढतो आहे. महापालिकेने याबाबत त्वरित उपाययोजना करावी.
- राजेंद्र तरस, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crying Club: मुंबईत 'द क्रायिंग क्लब'ची सुरूवात; ही संकल्पना नेमकी कुठून आली? ते लोकप्रिय का होतंय? जाणून घ्या सर्वकाही...

AUS vs SA T20 : एका हातात बिअर अन् दुसऱ्या हाताने झेल; टीम डेव्हिडने टोलवलेल्या चेंडूचा प्रेक्षकाकडून भन्नाट कॅच, पाहा VIDEO

'डोनाल्ड ट्रम्प यांनी मला डेटसाठी विचारलेलं,' प्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली...'फोन करुन त्यांनी डिनर...'

अहिल्यानगर जिल्हा हादरला! 'चिमुकल्यांसह विवाहितेने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले; जामखेड तालुक्यातील घटना, वेगळचं कारण आलं समाेर..

मुंबईकरांना अनुभवता येणार डबेवाल्यांची सव्वाशे वर्षांची कारकीर्द, एक्सपिरियन्स सेंटर होणार खुलं होणार, काय खास असणार?

SCROLL FOR NEXT