निगडी, ता. ३० ः त्रिवेणीनगर (तळवडे) चौकातील सेवा रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.
स्पाइन रोड (भोसरी) ते भक्ती-शक्ती मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे या चौकातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोटरसायकली, पायी जाणारे नागरिक, अवजड वाहने आणि मोठ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने दुचाकीस्वारांना साइड पट्टीवरून प्रवास करावा लागत आहे. मात्र, सेवा रस्त्यावर केवळ मुरूम टाकण्यात आल्याने वाहने घसरण्याचा धोका वाढला असून विशेषतः रात्री अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. सेवा रस्त्याचे डांबरीकरण झाल्यास सायकलस्वार व दुचाकी वाहनचालकांना सुरक्षित प्रवास करता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात सोसायट्या असून, येथील रहिवासी दररोज स्पाइन रोडचा वापर करतात. या रस्त्यावर होणारी धूळ व अस्वच्छता याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे या सेवा रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे तसेच चौकात योग्य सिग्नल व्यवस्था उभारावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.